Boss is Always Right | आनंद महिंद्रा यांनी दिली आपल्या सहकार्यांना अजब सूचना | Lokmat Marathi News

2021-09-13 3,856

आनंद महिंद्रा ट्विटरवर कायम अॅक्टीव्ह असतात. वेगवेगळे फनी ट्वीट करत ते कायमच ट्विपल्सचे लक्ष वेधून घेतात. नुकतेच त्यांनी असेच एक मजेशीर ट्विट केले आहे जे ट्विटवर चांगलेच ट्रेंड होत आहे. यावेळी त्यांनी एक मजेशीर फोटो ट्विट केला असून यामध्ये अंड्याने भरलेली एक व्हॅन दिसत आहे. आता हे नेहमीचेच चित्र असले तरीही यामध्ये एक विशेष गोष्ट आहे. अंड्याचे ट्रे गाडीतून खाली पडू नयेत म्हणून एक मुलगा त्यासमोर बसल्याचे यामध्ये दिसते आहे. आता एरवी सामान वाहून नेताना टेम्पो किंवा ट्रकमध्ये रस्सीने बांधले जाते. पण या टेम्पोला असलेल्या जादाच्या चाकावर एक मुलगा अतिशय हास्यास्पद पद्धतीने बसलेला दिसतो. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये महिंद्रा कंपनीच्या भारतातील डिझाईन टीमला टॅग केले आहे. गाडीला जास्तीचे चाक लावताना भारतात ग्राहक प्रत्येक गोष्टीचा कसा वापर करतात हे आपल्याला लक्षात घेऊन गाडीचे डिझाईन तपासायला हवे. त्यामुळे काहीतरी हटके आणि सहज अंदाज बांधता येणार नाही असे काहीतरी डोक्यात ठेवा असा सल्लाही दिला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires